Breaking News

विद्यार्थ्यांनी शासकीय योजनेचा ग्रामीण लाभ घ्यावा : भोसले


श्रीरामपूर प्रतिनिधी ;- ग्रामीण भागातील युवक, युवतींना दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या नोकरीच्या सुवर्णसंधी निर्माण केल्या आहेत. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जीवनप्रीत अभियानतर्फे कारडा स्कीलिंग सर्व्हिसेस मार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिकचे विभागप्रमुख विजय भोसले यांनी प्रतिपादन केले.

ते म्हणाले, की शासन तुमच्या दारात असून ही योजना फक्त ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी आहे. यावर भारत सरकारचे नियंत्रण आहे. प्रत्येकाला स्कील देऊन घडवायचे आहे. शासनाकडून प्रशिक्षण, राहण्याची मोफत व्यवस्था आदी सुविधा दिल्या जातात. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी उपलब्ध केली जाते. विविध ठिकाणी नोकरी मिळते. अशी सुवर्णसंधी शिरसगावला आज मिळत आहे. दि. २५ जानेवारीच्या आत सर्वांनी आवश्यक आपापली कागदपत्र शिरसगावच्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावीत. यासाठी ३ महिने प्रशिक्षण, मोफत संगणक शिक्षण, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, अद्यावत सुरक्षा व्यवस्था, नाशिक, पुणे, ठाणे, धुळे, औरंगाबाद आदी जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणार आहे.