Breaking News

प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा


जवळके ( प्रतिनिधी) - कोपरगाव तालुक्यातील वेस - सोयेगांव येथील ग्रामपंचायत कार्यलयामध्ये गणराज्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वेस- सोयेगांवचे सरपंच माणिकराव दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.