बँकाना 88 हजार कोटींचा निधी जाहीर पंतप्रधान मोदी यांचा बुडीत बँकासाठी दिलासा देणारा निर्णय
नवी दिल्ली : राष्ट्रीयकृत बँकाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला असून, या बँकाना तब्बल 88 हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बँकाच्या ध्येयधोरण आणि बुडीत बँकाविषयी चर्चा झडण्यास सुरूवात झाली आहे.
मार्च महिन्यापर्यंत राष्ट्रीयकृत बँकांना केंद्र सरकार 88 हजार कोटी रुपये देणार आहेत. ज्या बँका बुडीत कर्जाने बेजार झाल्या आहेत त्यांना सरकारने मोठी मदत जाहीर केल्यामुळे या बँकाना हा मोठा दिलासा आहे. बुडीतकर्जांनी बेजार झालेल्या या बँकांसाठी ही संजीवनीच ठरणार आहे. यामध्ये सर्वात जास्त भांडवल, म्हणजे 10 हजार 610 कोटी आयडीबाआय बँकेला मिळणार आहेत. तर त्यापाठोपाठ बँक ऑफ इंडिया दुसर्या स्थानावर असून 9232 कोटी मिळणार आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या काळात सर्वात जास्त पैसा जमा झालेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला 8800 कोटी मिळणार आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे विजय मल्ल्याने स्टेट बँकेचेच तब्बल 9000 कोटी बुडवले आहे. मात्र, ही मदत जरी असली तरी या प्रक्रियेला फेरभांडवलीकरण असे म्हटले जात आहे. दरम्यान, युको बँक - 6507 कोटी, पंजाब नॅशनल बँक 5473 कोटी, बँक ऑफ बरोडा 5375 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 5158 कोटी, कॅनरा बँक 4865 कोटी, युनिअन बँक ऑफ इंडिया 4524 कोटी, देना बँक - 3045 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र 3173 कोटी, कॉर्पोरेशन बँक 2187 कोटी, सिंडिकेट बँक 2839 कोटी, अलाहाबाद बँक 1500 कोटी रूपयांचा निधी बँकाना देण्यात आल्यामुळे केंद्र सरकारवर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे तब्बल 9 हजार कोटी बूडवत विजय मल्ल्या फरार झाल्यामुळे, बँकाच्या ध्येयधोरणांवर, आणि बँकाच्या प्रशासनाकडून कॉर्पोरेट जगताला देण्यात येणार्या ढीलमुळे देखील बँकावर टीका होत आहे.