Breaking News

रासपचा पश्‍चिम महाराष्ट्र पदाधिकारी-शेतकरी मेळावा


राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्‍चिम महाराष्ट्र पदाधिकारी व शेतकरी मेळावा बुधवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता दहिवडी, ता. माण येथे होत असुन, या कार्यक्रमासाठी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष, युवक, महिला, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, युवती, कामगार, वाहतूक आदी आघाड्यांचे प्रमुख व इतर पदाधिकारी यांच्यासाठी हा मेळावा होत आहे. मेळाव्यासाठी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी व शेतकर्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रासपचे कर्जत तालुका संपर्क प्रमुख भरत लांबोर यांनी केले आहे.