रेकॉर्डवरील 80 गुन्हेगारांची पोलीस आयुक्तांपुढे पेशी !
अमरावती, - मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या. त्यामुळेच थर्टी फर्स्टला शहरात काही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आयुक्तालयातील सर्वच ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी ज्या गुन्हेगारांविरुद्ध 2011 पासून शरीराविरुद्धचे (बॉडी ऑफेन्स) गुन्हे दाखल आहेत त्यांना हजर करण्याचे आदेश ठाणेदारांना दिले होते. या वेळी खोलापुरी गेट पोलीस ठाणे वगळता इतर नऊ पोलीस ठाण्यांनी आपापल्या हद्दीतील गुन्हेगारांना पोलीस आयुक्तांपुढे हजर केले होते.
आयुक्तालयात एकत्र आलेल्या या सर्व गुन्हेगारांना पोलीस आयुक्तांनी समज दफन शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण काही गोंधळ घातल्यास आम्ही कारवाईसाठी सज्ज आहोत, असा इशारा या वेळी उपस्थितांना देण्यात आला. या वेळी खोलापुरी गेट पोलिसांना मात्र हद्दीतील एकाही गुन्हेगाराला हजर करण्यात यश आले नाही. तसेच नागपुरी गेट पोलिसांनी केवळ तिघांना हजर केले होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या दोन्ही ठाण्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याचवेळी सर्वाधिक 21 राजापेठ, गाडगेनगर 4, नांदगाव पेठ पाच, फ्रेजरपुरा 13, नागपुरी गेट तीन, भातकुली एक, बडनेरा नऊ, वलगाव तीन, खोलापुरी गेट शून्य, गुन्हे शाखा सात असे एकूण 80 जणांना बोलावण्यात आले होते. थर्टी फर्स्टला शहरामध्ये काही अनुचित घटना घडू नये, याबाबत सूचना देण्यात आल्या.