Breaking News

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने 6 मुलांना विषबाधा

जळगाव,  - चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील सहा बालकांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याने तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी तातडीने या बालकांवर उपचार केले. 


दुपारी 12 वाजेच्या सुमारास खेळतांना छोटू दीपक कापसे (3), प्रदीप छोटू कापसे (5), राहुल बापू कापसे (7), पूनम बापू कापसे (6), गणेश बारकू कापसे (8), अमोल बारकू कापसे (6) या बालकांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. यानंतर त्यांना जुलाब व उलट्या सुरू झाल्याने त्यांना तातडीने तळेगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना चाळीसगावच्या ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले.