Breaking News

निर्दयी काकीने 5 वर्षाच्या पुतणीला दिले चटके


पालघर, दि. 27, जानेवारी - नालासोपारा पश्‍चिमेकडील श्रीप्रस्था येथे एका निर्दयी काकीने 5 वर्षाच्या पुतणीला चटके दिले, गौ रक्षा सेवा समितीचे अध्यक्ष निलेश भट यांनी त्या पिडीत मुलीची सुटका करून नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले.नालासोपारा पोलिसांनी काकीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.नालासोपारा श्रीप्रस्था नीलगंगा अपार्टमेंट मध्ये बी 203 मध्ये रागिणी संजय सिंग हिच्या कडे पिडीत मुलीच्या आई वडिलांनी शिक्षणासाठी पाठवले होते.मात्र रागिणी त्या चिमुरड्या मुलीला जबरदस्त मारहाण करून तिच्या पार्श्‍वभागावर संपूर्ण अंगावर चटके दिले होते.गेल्या 5 ते 6 महिन्यापासून पिडीत मुलीचा छळ करीत असल्याची खबर एका इसमाने गौ रक्षा सेवा समितीचे अध्यक्ष निलेश भट यांना दिली.भट यांनी पोलिसांना घेवून त्या मुलीच्या घरी जावून सुटका केली.