अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या सावत्र भावाला 4 दिवसाची पोलीस कोठडी
ठाणे, दि. 21, जानेवारी - अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणा-या सावत्र भावाला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुभाष यादव असे आरोपीचे नाव आहे. 24 वर्षीय सुभाष याने आपल्या 17 वर्षीय बहिणीवर वारंवार बलात्कार केल्याचे उघडकीस आले.
अल्पवयीन पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नराधमाला अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता. त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. येथील पिसवली गावातील एका चाळीत अल्पवयीन पीडित तरुणी आई व सावत्र वडिलांसह वास्तव्यास आहे. आरोपीही त्यांच्याबरोबर राहत होता. त्याने जून महिन्यात घरात कोणी नसल्याची संधी साधत तुझ्या आईसह भावाला ठार मारेन अशी धमकी दिली.
त्यानंतर तिला मारहाण करुन नराधमाने तिच्यावर घरातच बळजबरीने बलात्कार केला. अशाप्रकारे तिला धमकावत त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. मात्र त्रास असह्य झाल्याने तिने कुटुंबियांना हा प्रकार सांगून पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपीवर भादंवी 376 (2) (एन) 323, 506, तसेच पोक्सा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.