सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा समृध्दी बाधित शेतकरी करणार निषेध
नाशिक, दि. 25, जानेवारी - शेतकरी विरोधी भुमिका घेत असून समृध्दी महामार्गाकरीता जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात आहेत. मात्र यातून बागायती क्षेत्र वगळावे व भूसंपादन कायदा 2013ची अंमलबजावणी करावी अशी शेतक-यांची मागणी आहे. मात्र सरकार शेतक-यांची मुस्कटदाबी करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असून 24 जानेवारी प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेत सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेच्या निषेधाचा ठराव करून राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करण्याचा निर्णय समृध्दी बाधित संघर्ष समितीने घेतला आहे.
समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी पिकाऊ व बागायती जमीन संपादन करू नये व भूसंपादन कायदा 2013 ची कायदेशीर कारवाई करावी यासाठी आंदोलन सुरू आहे मात्र मुख्यमंत्री या विषयी भेट देत नाही. आंदोलन करणार्या शेतकर्यांवर पोलीस केसेस दाखल केल्या जात आहेत. मुख्यमंत्री समृद्धी बाधित शेतकरी आंदोलकांना दलाल म्हटले तसेच नाशिक येथे काळे झेंडे दाखवले म्हणून शेतकरी आंदोलकावर पोलीस खटले दाखल केले आहे.