नाशिकचा मुर्तुझा ट्रंकवाला 23 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार
नाशिक, दि. 20, जानेवारी - नाशिकचा धडाडीचा सलामी फलंदाज मुर्तंकवाला याची महाराष्ट्राच्या23 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे. तसेच नाशिक चा डावखुरा फिरकी गोलंदाज गौरव काळे ची ही पहिल्यांदा महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. 22 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान वडोदरा येथे महाराष्ट्र संघाची मुंबई, बडोदा, सौराष्ट्र व गुजरात विरुद्ध लढत होणार आहे.
मागील वर्षी मुर्तुझा ने बीसीसीआय च्या 23 वर्षाखालील सी के नायडू स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत चमकदार कामगिरी केली होती एक शतक व एक द्विशतक झळकावले होते, तसेच मागील वर्षी रणजी प्रदर्पणातच शतक झळकावले होते, यावर्षी सी के नायडू ट्रॉफी च्या पहिल्याच सामन्यात दिल्ली विरुद्ध शतक झळकावले, तसेच विदर्भ संघ विरुद्ध महाराष्ट्र संघाने विजय मिळविला त्या सामन्यातही मुर्तुझा ने नाबाद 49 धावा केल्या,यावर्षी मुर्तुझा ची रणजी संघात ही निवड झाली होती. मुर्तुझा च्या या सातत्य पूर्ण कामगिरी मुळेच त्याची पुनःश्च महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदी निवड झाली.