पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव मावळ येथे ब्राह्मणवाडी फाट्यावर कंटेनर आणि चारचाकी एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. बुधवारी पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी हा अपघात झाला. एका मयताचे नाव कळाले असून राहुल नागरगोजे (वय 24 रा.बावधन पुणे) असे त्यांचे नाव आहे. तर लालाचंद यादव (कंटेनर चालक), कारमधील रवीप्रेम सिंग, अमन सिंग, दीपाचू भारद्वाज, आणि राजेंद्र चन्नोत, अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान, घटनास्थळी राणी रुग्णवाहिकेसह वडगाव मावळ पोलिसांनी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व मृत आणि जखमी पिंपरी-चिंचवडमधील असून अद्याप काहींची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, डस्टर गाडी लिंबाजी नागरगोजे यांच्या नावाची असल्याची माहिती मिळाली आहे. वडगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात 2 ठार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:58
Rating: 5