Breaking News

इस्रो सोडणार 31 उपग्रह अंतराळात


नवी दिल्ली : इस्रो ‘शतका’च्या उंबरठ्यावर असून, 12 जानेवारीला म्हणजे शुक्रवारी आपल्या 100 व्या उपग्रहासह 31 उपग्रह अंतराळात सोडणार आहे. ऑगस्ट महिन्यात पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकलच्या माध्यमातून ’आयआरएनएसएस 1-एच’ उड्डाण अयशस्वी झाल्यानंतर ’इस्रो’ची ही पहिलीच मोहीम असणार आहे. शुक्रवारी ’पीएसएलव्ही -सी-40’मधून हवामानविषयक माहिती देणार्या भारताच्या ’कार्टोसॅट-2’ मालिकेतील उपग्रहासह 31 उपग्रह सोडण्यात येतील, अशी माहिती ’इस्रो’ उपग्रह केंद्राचे संचालक एम. अण्णादुरई यांनी दिली. श्रीहरीकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरमधील शुक्रवारी सकाळी 9.28 वाजता हे सॅटेलाइट लाँच होतील.