अंधेरीत बिबट्या आढळून आल्याने परिसरात भितीचे वातावरण
मुंबई, दि. 11, डिसेंबर - अंधेरी पूर्वेतील शेर-ए-पंजाब कॉलनीत असलेल्या एका क्लासरूममध्ये आज सकाळी बिबट्या शिरला. हा बिबट्या याच भागात लपून बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, वनविभागाची एक रेस्क्यू टीमसुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे. वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.