Breaking News

गुजरात निकालानंतर मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई, दि. 19, डिसेंबर - गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने विजयाची बाजी मारल्यानंतर मुंबईमध्ये भाजप कार्यलयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा के ला. गुजरात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये 182 जागांसाठी गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान पार पडले होते.

जोरदार प्रचारानंतर 2 टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाच्या निकालावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. गुजरात निवडणुकीत काँग्रेसवर मात करत भाजपने आघाडी घेतल्यामुळे कार्यक र्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.