Breaking News

मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण कायम - विनोद तावडे


मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सोयी सुविधा देण्यामध्ये शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये 5 टक्के आरक्षण कायम ठेवण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रश्न सदस्य संजय दत्त यांनी विचारला होता. श्री.तावडे पुढे म्हणाले मुस्लिम समाजाला खाजगी विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश व शासकीय सेवेतील भरतीसाठी दिलेल्या आरक्षणाला उच्च न्यायालायाने स्थगिती दिली आहे. सदर अध्यादेशाचे 23 डिसेंबर 2014 पर्यंत कायद्यात रुपांतर न झाल्याने सदर अध्यादेश व्यपगत झाला. हे प्रकरण उच्च न्यायालयात अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे. या चर्चेत सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, भाई जगताप, विक्रम काळे श्रीमती हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.