Breaking News

शेतजमीनीची दिलेली तक्रार काढून न घेतल्याने मारहाण ;एक जखमी


जामखेड - शेतजमीनीची दिलेली तक्रार काढून का घेत नाही? तसेच निकाल लागेपर्यंत रानातील ऊस तोडायचा नाही. या कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये एक जण जखमी झाला. या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरुन एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यातील एक गुन्हा अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 
या प्रकरणी फिर्यादी दादा लक्ष्मण ईपार( वय २६ रा.वंजारवाडी) यांनी पहील्या दाखल केलेल्या फीर्यादीत म्हटले आहे की आरोपी बाबासाहेब सुखदेव बांगर, सुदाम नवनाथ बांगर, सुखदेव रामा बांगर, भौय्यु बाबासाहेब बांगर,सर्व रा.वंजारवाडी. ता. जामखेड या चार जणांनी दि १३ डिसेंबर रोजी दुपारी फीर्यादीच्या रहात्या घरासमोर जाऊन, संगनमत करून म्हणाले की तु आमच्या विरोधात शेतजमीनीची कोर्टतील फीर्याद काढून का घेत नाही. तसेच येथुन पुढे कोर्टत साक्ष देण्यासाठी जायचे नाही असे म्हणुन घरातील लोखंडी पाईप ने तसेच लाथबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच पुन्हा काठीने मारहाण केली. . फीर्यादी ची आई भांडणे सोडविण्यासाठी आली असता तीला देखील मारहाण केली. या प्रकरणी वरील एकुण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या परस्पर अदखलपात्र विरोधी दाखल झालेल्या फिर्यादीत फीर्यादी बाबासाहेब सुखदेव बांगर यांनी म्हटले आहे की, आरोपी दादा लक्ष्मण ईपार, मारुती लक्ष्मण ईपार, पारुबाई लक्ष्मण ईपार, विठ्ठल रामा अव्हाड यांनी यातील फीर्यादी च्या गट नं २०/२/४व गट नं २० /२/ब/४ या शेतातील बांधावरुन ऊस कोर्टाचा निकाल लागेपर्यंत या रस्त्याने घेऊन जायचा नाही व तोडायचाही नाही.असे म्हणुन फिर्यादी बाबासाहेब बांगर यांना वरील चार आरोपींनी शेतातील ऊसाची तोडची आडवणुक करून लाथबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.वरील आरोपी हे गुन्हेगारी पाश्र्वभूमी चे आसुन त्यांच्या पासुन फीर्यादीच्या कुटुंबीयांना धोका असल्याने याबाबत चे निवेदन लवकरच पोलीस अधीक्षक व जामखेड पोलिस स्टेशनला देणार आहे असेही सांगितले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पो.हे कॉ. नवनाथ भिताडे हे करत आहेत.