Breaking News

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये : रोहमारे जवळके येथे पालक मेळावा उत्साहात


जवळके (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी महाविद्यालय सुरु केले आहे. या महाविद्यालयात येणार्‍या काळात ग्रामीण भागातील मुलांसाठी जास्तीत जास्त कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. मात्र शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, अशी अपेक्षा कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय येथे पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रोहमारे बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून के. जे. सोमैया कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक (अण्णा) रोहमारे साहेब हे होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री.सोनवणे डी.आर. यांनी केले. या वेळी मा. संदिप दादा रोहमारे ,मा.लक्ष्मण चंदूजी थोरात, मा. बाबुराव कारभारी थोरात, मा. नानासाहेब छ्बुराव पाडेकर व आदी मान्यवर व मोठया संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रा. सोनवणे सर यांनी पालकांचे स्वागत करून प्रास्तविक मध्ये कॉलेजच्या कामकाजाच्या व प्रगतीच्या दृष्टिकोणातून आपले विचार मांडले. प्रमुख अतिथी डॉ. बी.एस. यादव यांनी पालकाशी चर्चा करतांना अनेक समस्या सोडवण्यासाठी तसेच मुलांना शिक्षणासाठी भविष्यात काय करायचे याचे मार्गदर्शन पालकांना केले.

त्यावर पालकांची समाधानकारक उत्तरे मिळत होती. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात अशोकराव रोहमारे पुढे म्हणाले की, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये तसेच हे महाविद्यालय असे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे, अध्यक्ष रोहमारे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. सोनवणे डी. आर प्रा.गुंजाळ सर, प्रा.गोर्डे मॅडम , प्रा.लोंढे सर, प्रा.दातीर सर, प्रा.सोनवणे सर, प्रा.गोर्डे सर प्रा.वाघ सर प्रा. कुरकुटे सर व भालेराव सर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.गोर्डे सर यांनी केले. व , प्रा.वाघ सर यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला