Breaking News

दत्तवाडी शाळेचा सर्वांनी आदर्श घ्यावा : सभापती आव्हाड


जामखेड ता. प्रतिनिधी - जिल्ह्या परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था, या शाळांचा शैक्षणिक दर्जा, शाळेच्या इमारती याविषयी जिल्ह्यात नाराजी आहे. मात्र दत्तवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेले शिक्षण आणि शस्तप्रिय वातावरण पाहून समाधान वाटते. त्यामुळे या शाळेचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी केले. 

धोंडपारगाव येथील दत्तवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत नान्नज केंद्रातील १९ शाळांच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. संरपच सुखदेव शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी केंदप्रमुख सुनील बुद्धिवंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाळेचे शिक्षक मनोहर इनामदार, पुजा बळे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकसहभागातून शाळेत अनेक उपक्रम राबविले आहेत. 

येथील विद्यार्थी गुणवत्तादेखील सर्वोत्तम असून या शाळेला अनेक उच्चपदस्थ मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. दरम्यान, या प्रशिक्षणाची सुरूवात विद्यार्थ्यांच्या आदर्श परिपाठाने झाली. यात सुत्रसंचालन, हार्मोनियम, वादन, महात्मा फुले यांचा कार्यपरिचय, स्वरचित कवितावाचन, योगासनांची प्रात्यक्षिके, स्वलिखीत बोधकथा आदी विद्यार्थी यांनी प्रभावीपणे सादर केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम शिंदे यांनी दत्तवाडी शाळेच्यावतीने उपस्थितांचे स्वागत केले.

नान्नजचे मुख्याध्यापक जालींदर राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचा अहमदनगरचा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले हनुमंत निबांळकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी केंद्रप्रमुख बुद्धीवंत यांनी प्रास्ताविक केले.

गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे, विजय महामुनी, राजेंद्र मोहळकर, नामदेव गर्जे, विजय जेधे, रामेश्वर ढवळे, अमोल जाधव, मारूती फड, फिरोजखान दुलेखान, पोपट तुपसौंदर, मीना आरसुळ, शर्मिला मोटे, शोभा कांबळे, सुमन पाडळे, आशाबाई राऊत, प्रियंका खोसे व आशाबाई सोनवणे यांनी परिश्रम घेतले. राशीन येथील प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत आर्ट्स यानी महात्मा फुले यांचे रेखाटलेले फलकचित्र लक्षवेधी ठरले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जामखेड तालुका अध्यक्ष समीर शेख, नंदूसिग परदेशी, नान्नजचे उपसंरपच तुळशिराम मोहळकर, अनिल भोसले आदींसह धोंडपारगावचे ग्रामस्थ या प्रशिक्षणास मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेब कुमटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.