Breaking News

शिर्डीच्या स्वाती बोरावके या म.फुले उद्योजक पुरस्काराने सन्मानित

शिर्डी/प्रतिनिधी - महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने महाराष्ट् माळी समाज प्रबोधिनी आणि विविध फुले विचारवादी संघटनातर्फे अयोजित करण्यात आलेल्या ज्योती अस्थिवंदना आणि दीपोत्सवाच्या कार्यक्रमात शिर्डी भूमिच्या तथा साई हेरीटेज व्हिलेजच्या संचालिका स्वाती किशोर बोरावके यांना महात्मा फुले उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 


पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यात हा कार्यक्रम अयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द उद्योजक अरूण कुदळे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून मा.आ.कमल ढोले, पांडुरंग राउत, विकास रासकर, रामदास डोके यांच्या उपस्थितीत तसेच प्रमुख पाहूणे कृषी विद्यापिठाचे मा.कुलगुरू योगेंद्र नेरकर यांच्या हस्ते स्वाती किशोर बोरावके यांना महात्मा फुले उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

शिर्डीतील साकुरी शिवावर स्थित असणा-या 100 वर्ष जुन्या चिकुच्या बागेत साई बाबांच्या जिवण चरित्राला उजाळा देण्यात यावा. यासाठी साई हेरीटेज व्हिलेज या उद्यानाची निर्मीती करण्यात आली. असंख्य साई भक्त साई बाबांना जाणून घेण्यासाठी याकडे वळतात. याची उभारणी स्वाती बोरावके यांनी केली आहे. त्याच्याच प्रित्यर्थ त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आलेले आहे. 

पुरस्काराला उत्तर देतांना त्या म्हणाल्या की, ख-या अर्थाने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार फक्त माळी समाज्यासाठी नाही तर ते सर्व समाज्यासाठी मार्गदर्शक आहेत. याचा आज मला प्रत्यय आला. मी जन्माने मराठा समाजाची असून देखिल मला या संघटनांनी हा पुरस्कार दिला. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे ऋणी राहील. 

याप्रसंगी संयोजक दशरथ कुळधरण, उद्योजक दीपक कुदळे, ज्ञानज्योती फाउंडेशनच्या सचिव कुंडलिक चैधरी सह उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन अॅड. संभाजी बोरूडे यांचे फुले दाम्पत्यांवरील व्याख्यान केले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे, केंद्रप्रमुख बुद्धीवंत यांनी आभार बाबासाहेब कुमटकर यांनी आभार मानले.