जिल्ह्यात बीएसएनएल सेवेचा बोजवारा
सिंधुदुर्गनगरी, दि. 21, डिसेंबर - जिल्ह्यात बीएसएनएल नेटवर्क संपर्कात आणि इंटरनेट सेवेत निर्माण झालेला अडथळा ग्राहकवर्गासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. अत्यंत धीम्या गतीच्या या सेवेमुळे ग्राहकांना अक्षरशः हैराण होण्याची वेळ आली आहे. महिन्याभरापूर्वीच ब्रॉडबँड सेवाच विस्कळीत झाल्यामुळे इंटरनेट आणि संपर्क सेवा पूर्णपणे कोलमडली होती.
त्यानंतर पाच दिवस काही प्रमाणात हि रुळावर आली होती; मात्र आता पुन्हा तेच चित्र दिसून येत आहे. डिजिटलच्या नावाखाली अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षाही ग्राहक संख्या वाढल्यामुळे सेवेचा योग्य लाभ ग्राहकांना घेता येत नाही. डिजिटलच्या दुनियेत सर्वांकडेच सेलफोन आहेत;मात्र अत्यंत धीम्या गतीने चालणार्या बीएसएनएलच्या सेवेमुळे ग्राहकवर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
गावोगावी कमी क्षमतेचे टॉवर उभारले जाऊन गावे संपर्काने जोडण्याचे काम सरकारने केले;मात्र संपर्कातही मोठे दोष निर्माण होत असल्यामुळे ग्रामीण भागातही मोठी नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान नवीन ग्राहक जोडण्यासाठी लवकरात लवकर यावर उपाययोजना शोधणे आवश्यक आहे. अन्यथा बीएसएनएलच्या मोबाईल ग्राहकांत पुढील काही दिवसांत वाढ होण्याबाबत साशंकता आहे.