गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या
धुळे, दि. 21, डिसेंबर - साकी तालुक्यातील धाडणे फाट्यावर एका प्रेमीयुगुलाने वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना सकाळी उघडकीस आली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे़
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गालगत साक्री ते पिंपळनेर रोडवर असलेल्या धाडणे गावाच्या फाट्यालगत एका वडाचे झाड आहे़ या झाडाला धाडणे (ता़ साक्री) येथील कैलास रमेश बागुल आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दिपाली सोमनाथ चव्हाण (गाव माहित नाही) या प्रेमीयुगुलाची नावे पुढे येत आहेत़ त्यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला आणि आपल्या प्रेमाला पुर्णविराम दिला़ ही घटना सोमवारी रात्री घडली असावी असा अंदाज असून सकाळी ही बाब उघडकीस आली़ या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली आहे़ घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी भेट दिली आहे़ प्रेमीयुगुलांबद्दल माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे़ घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत़.