समृद्धी महामार्ग बाधीत आंदोलक शेतक-यांना दलाल म्हणणार्या मुख्यमंत्र्यांचा निषेध
नाशिक, दि. 21, डिसेंबर - समृद्धी महामार्ग बाधीत जे शेतकरी आंदोलन करत होते ते आता दलाल बनले आहेत, अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या विरोधात मुख्यमंत्री जेव्हा 10 जिल्ह्यात येतील तिथे जावून काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा निर्णय समृद्धी बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने घेतला आहे.
आंदोलक शेतक-यांना भेटी व चर्चासाठी गेल्या 16 महिन्यापासून मुख्यमंत्री वेळ देत नाही.
शरद पवार यांनी प्रयत्न करून लावलेली बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केली होती. नाशिक जिल्हयात शिवडे येथील शेतक-यांनी रक्ताचे पत्र लिहून भेटीसाठी प्रयत्न केला तरी चर्चासाठी व समृद्धी महामर्गातील विरोध करत असलेल्या गावांना मुख्यमंत्र्यांनी भेटी द्याव्यात. बागायती जमिनी पहाव्यात ही माफक अपेक्षा ही मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केकेली नाही. उलट आंदोलक शेतकरी आता दलाल बनले असल्याचे विधान करून शेतक-यांचा अपमान केला आहे. दि.19 डिसेंबर रोजी नागपूर येथे समृद्धी बाधीत शेतकरी धरणे आंदोलनासाठी बसले होते. मात्र मुख्यमंत्री भेटले नाहीत. शेवटी शेतकरी मुख्यमंत्र्याच्या निषेधाच्या घोषणा देऊन निघून आले आहेत.
राज्याच्या प्रमुखानी शेतकरी आंदोलन संदर्भात दलाल म्हणून उल्लेख केला आहे. या दलालांना दलाली महाराष्ट्र शासनामार्फत अधिकारी देत आहे.दलाली करणा-या व जनतेच्या पैशाची दलाल देणा-याची न्यायालयीन चोकशी करावी. अशी मागणी समृद्धी बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने करीत आहोत.