Breaking News

लाच मागणार्‍या उपविभागीय अधिकार्‍याला लाचलुचपत विभागाकडून अटक.


औरंगाबाद, दि. 30, डिसेंबर - कुळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी आदेशाला स्थगिती देण्यासासाठी लाच मागणार्‍या सिल्लोडच्या उपविभागीय अधिकार्‍याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. अनिल माचेवाल असे या उपविभागीय अधिकार्‍याचे नाव आहे. माचेवालने स्वीय सहाय्यक रत्नाकर साखरे याच्यामार्फत लाच घेतली असून विभागाने त्यालाही अटक केली आहे. 

सिल्लोड तालुक्यातील चांदापूर येथे तक्रारदाराची 29 एकर कुळ जमीन आहे. मात्र या जमिनीचे बनावटी दस्तावेज तयार करुन विक्री करण्यात आली होती. ही बाब तक्रारदाराच्या लक्षात आल्यावर त्यांनी उपविभागीय अधिकारी माचेवालकडे विक्रीवर स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र स्थगिती देण्यासाठी माचेवालने एक लाखाची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी रत्नाकर साखरे आणि उपविभागीय अधिकारी माचेवाल यांना अटक केली.