जिल्हा परिषद शाळा खोल्यांसाठी ३८ लाखांचा निधी मंजूर : होन
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्व धोकादायक इमारतींचा एकत्रित अहवाल तयार करून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला होता. यापैकी जिल्हा परिषदेच्या कोपरगाव स्टेशन, भोजडे, करवाडी, जवळके, करंजी, ओगदी व संवत्सर येथील निरगुडे वस्तीवरील धोकादायक असलेल्या शाळांच्या नवीन खोली बांधण्यासाठी निधी प्राप्त झाला. या अहवालापैकी अजूनही ब-याच धोकादायक शाळा खोल्या व इमारतींचे नूतनीकरन होणे गरजेचे आहे. त्यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित कामांना निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी युवा नेते काळे प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत आहे. सध्या कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्यांचे कामे सुरु आहेत. यामध्ये चासनळी दहिवडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, हंडेवाडी पुतळावाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, प्रजिमा ४ ते खिर्डी गणेश प्रजिमा ५ रेल्वे स्टेशन रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, सोनेवाडी ते तालूका हद्द रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण आदी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच पंचायत समितीच्या नूतन इमारत बांधकाम करण्यासाठी रुपये ५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर माजी आ. अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत कोळगाव थडी पाणी पुरवठा योजनेच्या ५२ लाख ६४ हजार २३९ रुपये खर्चाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यापुढेही युवा नेते काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा धडाका असाच सुरु ठेवणार असल्याचे सभापती अनुसया होन यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.