Breaking News

औरंगाबादच्या मॅालमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश


औरंगाबाद शहरातील सर्वात मोठ्या प्रोझोन मॅालमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा शहर पोलीसांनी पर्दाफाश केला असून पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून हा प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 12 परदेशी मुली आणि तीन ग्राहक आढळून आले आहेत.
प्रोझोन मॅालमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या दोन स्पामध्ये ग्राहकांना मुली पुरवल्या जात होत्या. ग्राहकांकडून स्पा आणि मुलींसाठी 13 हजार रूपयांची आकारणी केली जात होती.या दोन्ही स्पांचा मालक एकच असून तो मुंबईचा आहे. धाडीत पकडल्या गेलेल्या मुली या भारतामध्ये टुरिस्ट व्हिजावर आलेल्या आहेत.