Breaking News

जानेवारीपासून शिर्डीत तीन दिवसाआड पाणीपुरवठा

शिर्डी प्रतिनिधी - शिर्डी नगरपंचायतच्या पिण्याचे पाणी साठवण तलावात १५ कोटी रुपये खर्चून जियो मेमरन पेपर शिट टाकण्याचे कामकाज दि. १ जानेवारी पासून सुरू होणार आहे. त्यामुळे शिर्डी शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली. 


शिर्डीतील लोकसंख्या वाढत आहे. सद्यस्थितीत रोटेशन आल्यानंतर तलावातील पाणी दीड महिनाच पुरते. मात्र कागद टाकल्यानंतर तेच पाणी तीन महिने पुरेल. त्याचबरोबर पाणी गळती थांबून तलावातील पाणी क्षमता वाढणार आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून साईबाबा संस्थानच्या तलावातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. साठवण तलावातील पेपरशिट टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनाही पाणी काटकसरीने वापरुन नगरपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दिघे यांनी केले आहे.