संगमनेर मटकाकिंगची इतर अवैद्य व्यवसायात घुसखोरी.
देवाचे नाव धारण करणाऱ्या या मटका किंगने 1980 च्या दशकात या व्यवसायत प्रवेश केला होता. अतिशय सभ्यतेची भाषा असणाऱ्या या मटका व्यवसायीकांचे वागणे मात्र वेगळे आहे. सुरुवातीला इतरांच्या हाताखाली काम करून मटका व्यवसायाचा त्यांने पूर्ण अभ्यास केला. हळूहळू स्वतःच त्याने हा व्यवसाय सुरु केला. पोलीसांना हाताळण्याची हातोटी त्याच्याकडे असल्याने शहरात खुलेआमपणे मटका व्यवसाय चालविण्यात तो यशस्वी ठरला. मटका बंदीच्या काळातही संगमनेरात हा व्यवसाय तेजीत होता.
दररोज लाखे रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असल्याचे इतरांनीही या व्यवसायात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु या मटकाकींगने त्यांची डाळ शिजू दिली नाही. शहर व परिसरात त्याच्या देखरेखी खाली सध्या 40 हून अधिक मटक्याच्या टपऱ्या कार्यान्वित आहे. या टपऱ्यांमध्ये दररोज शेकडो नागरीक येवून मटका लावतात. पोलीस ठाण्याच्या इमारतीपासून अवघ्या काही अंतरावर मटका खुलेआम सुरु असतानांही पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहे. यामुळे या व्यवसायाचे चांगलेच फावले आहे.
मटका व्यवसायबरोबरच शहरात इतर अवैद्य व्यवसायही तेजीत सुरु आहे. या धंद्यातही मोठी कमाई असल्याने या मटकाकींगने इतर अवैद्य धंद्यातही लक्ष घातले आहे. सगळे व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पोलीसांची व्यवस्था लावण्यापासून इतर कामेही त्यांनी सुरु केल्याने हे व्यवसाय करणारे संतप्त झाले आहे. त्यांच्यामध्ये भविष्यात वादाची ठिणगी पडू शकते असे शहरातील चित्र आहे. जिल्ह्या तील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील अवैद्य व्यवसायात लक्ष घालून सर्व व्यवसाय त्वरीत बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरीकांमधुन होतांना दिसत आहे.