Breaking News

आ. बाळासाहेब थोरात हिमाचलप्रदेशच्या निरीक्षकपदी

संगमनेर प्रतिनिधी - राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूकीतील काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ निरीक्षकपदी महाराष्ट्रातील काँग्रेसचे लोकप्रिय नेते माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची निवड केली आहे, अशी असल्याची माहिती कॉग्रेस पक्षाचे जनरल सेक्रटरी जनार्दन त्रिवेदी यांनी दिली. 


नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाने खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले. खर्‍या अर्थाने हा काँग्रेसचा मोठा नैतिक विजय ठरला. या निवडणूकतीत आ. ब थोरात यांनी काँग्रेस उमेदवार निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचा आ. थोरातांवर मोठा विश्‍वास आहे. त्यांच्या कामांचा आवाका मोठा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर हिमाचल प्रदेशच्या पक्षाच्या विधिमंडळ निरीक्षकपदाची जबाबदारी आ. थोरात यांच्यावर सोपविली. या निवडीबद्दल आ. बाळासाहेब थोरात यांचे अनेकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.