औरंगाबाद : प्लॉटींगच्या वादातून व्यवसायिकाचा खून
औरंगाबाद, दि. 30, डिसेंबर - छावणी परिसरातील पेंशनपुरा येथे एका व्यवसायिकाचा प्लॉटींगच्या वादातून धारदार शस्त्रासह लोखंडी रॉडने खून करण्यात आल्याची घटना घडली. हुसेन खान अलियार खान असे खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.
छावणी परिसरातील पेंशनपुर्यात राहणारे शेरखान यांचे हॉटेल आहे. तसेच त्यांचा प्लॉटींगचाही व्यवसाय होता. मात्र या प्लॉटींगच्या वादातून मारेकर्यांने शेरखान यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेरखान यांचा घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला झाला. दरम्यान, छावणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.