Breaking News

पासपोर्ट वितरणात कोल्हापूर देशात प्रथम


नवी दिल्ली : देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने सुरु झालेल्या नवीन पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाचमध्ये राज्यातील तीन शहरे असून पिंपरी चिंचवड दुसऱ्या तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.देशात 251 केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून यातील पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आलेल्या देशातील 59 केंद्रापैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहरे पहिल्या पाचमध्ये आहेत.