Breaking News

कोळसा घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा दोषी.

बहुचर्चित कोळसा घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा व तत्कालीन कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि इतर तिघांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने बुधवारी दोषी धरले आहे. अवैध कोळसा उत्खनन व भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला आहे. 


या सर्वांना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती भरत पाराशर यांनी मधू कोडा, तत्कालीन मुख्य सचिव ए. के. बसू, खाण संचालक विपीन बिहारी सिंह, अधिकारी बी. के. भट्टाचार्य व केंद्रीय कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना दोषी ठरविले आहे. 

२००७ साली आपले पद व अधिकारांचा गैरवापर करून त्यांनी कोट्यवधींची माया जमविली होती. तसेच अवैधरीत्या कोळसा उत्खनन करण्यात ते लिप्त होते. या प्रकरणातून आरोपी वैभव तुलसीयान, वसंत कुमार भट्टाचार्य, बिपीन बिहारी सिंह आणि नवीन कुमार तुलसीयान आदींची पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली आहे.