Breaking News

बिटकॉइन एक्सचेंजमध्ये आयकर विभागाची छापेमारी

देशातील प्रमुख बिटकॉइन एक्सचेंजमध्ये आयकर विभागाने बुधवारी छापेमारी केली आहे. करचोरीच्या संदर्भात ही कारवाई केली असल्याचे अधिकृत सूत्रानी म्हटले आहे. आयकर विभागाच्या बंगळुरू येथील तपास युनिटच्या नेतृत्वाखालील विभागाच्या विविध टीमने दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोचिन आणि गुरुग्रामसहित नऊ एक्सचेंज परिसरात सव्र्हेचे काम केले आहे. 


ही कारवाई आयकर विभागाच्या कलम १३३ ए च्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. या कलमाच्या अंतर्गत कारवाईचा उद्देश असा आहे की, गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्याच्या ओळखीचा पुरावा गोळा करणे, त्यांच्याकडून करण्यात आलेले सौदे, दुसऱ्या पार्टीची ओळख, वापरण्यात आलेल्या बँक खात्याची माहिती घेणे असा आहे.