Breaking News

पिंपरखेड येथील असहाय्य विधवा महिला न्यायाच्या प्रतीक्षेत


जामखेड/ ता.प्रतिनिधी/ - जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील असहाय्य विधवा महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. पिंपरखेड येथील विधवा महिला वैशाली राहूल पवार ही आपल्या दोन मुले आर्यन राहूल पवार व समर्थ राहुल पवार या चिमूरडया मुलासमवेत राहत असून शेती व मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत आहे. पण या असहय्य महिलेला पिंपरखेड गावातील जामखेड पंचायत समिती चे माजी उपसभापती अंकुश ढवळे सह पांडुरंग ढवळे, विशाल गाडेकर यांच्या कडून वेळोवेळी त्रास दिला जात आहे. 
तसेच वैशाली यांच्या पिंपरखेड येथील गट नंबर 431 मधील 80 आर या शेतजमीनीत अतिक्रमण करून वरील व्यक्तीने व्यायाम शाळेचे परिपूर्ण असे आरसिसीचे बांधकाम केले आहे. त्यावर आपला हक्क दाखवून वहीवाट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्यास विरोध करणाऱ्या विधवा वैशाली पवार या महिलेस वेळोवेळी प्रयत्न करून त्रास दिला जात आहे. या वा इतर कारणाने वैशाली ला नेहमीच धाकटपश्या दाखवीत होते. याला कंटाळुन दि. 10/11/2017 रोजी वैशाली पवार या विधवा महिलेने विष घेऊन आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने ती बचावली त्या वेळेस जबाब देऊन सुद्धा जामखेड पोलिसकडून आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होणे गरजेचे असताना जामखेड पोलीसाच्या वतीने सारवासारव करून गुन्ह्याची तीव्रता कमी समजून सक्षम गुन्हा दाखल न होता एन सी दाखल करण्यात आला.

यामुळे पिंपरखेड येथील वैशाली राहूल पवार हिचा भाऊ नितीन काशीनाथ चोरगे आपल्या बहीनीच्या न्यायासाठी पोलिस अधीक्षक अहमदनगर यांच्या कडे दि. 27/11/2017 रोजी सविस्तर अर्ज देऊन बहीनीच्या न्याय साठी मागणी केली होती, पण काहीच उपयोग झाला नाही पोलिस अधीक्षक कार्यालय ने सुद्धा दखल घेतली नसल्याचे वैशाली चा भाऊ नितीन चोरगे याने सांगितले त्यानंतर 11/12/2017 रोजी वरील इसमाकडून वैशाली राहूल पवार ही मुलांना घेऊन शाळेत सोडायाला जात असताना पिंपरखेड येथील वरील इसमानची असणारी लिंबू खरेदीची आडत या समोर उभे राहून वैशाली पवार हिच्या कडे पाहात लज्जा उत्पन्न होईल. अशा पद्धतीने हातवारे आणि हावभाव करून शिटी वाजून शारीरिक व मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. असे वैशाली राहूल पवार हिने दिलेल्या पोलिसातील एन सी फिर्यादीत म्हटले आहे. 

मात्र जामखेड पोलिसानी यावेळेस सुद्धा जामखेड पंचायत समिती चे उपसभापती अंकुश ढवळे सह पांडूरंग ढवळे, विशाल गाडेकर यांच्या विरोधात सक्षम गुन्ह्याची नोंद न करता एन सी नोंदवून वैशाली ला परत पाठवले त्यामुळे वैशाली च्या मनात भिती निर्माण झाली असून आपणास न्याय मिळेल का नाही अथवा हा त्रास कुठपर्यंत सहन करावा लागेल तसेच आपल्या लहान मुलांच भवितव्य काय मी निराधार आहे मला साथ नाही व पाठींबा नाही त्यामुळे काय करावे तेव्हा मला न्याय मिळेल का नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे आजही आपल्या दोन चिमूरडया सह ती आपल्या भावाकडे राहत असून दहशतीच्या वातावरणाखाली आपले जीवन जगत आहे. पोलिस आणि न्याय व्यवस्थेवरील भरोसा दिवसेंदिवस मावळत चालला आहे या विषय वैशाली चा भाऊ नितीन चोरगे वैशाली ची दोन चिमूरडी मुल व वैशाली पवार यांनी आपली कैफियत सांगितले असून न्यायाची मागणी केली आहे. आता तरी वैशाली पवार व तिच्या चिमूरडया ला न्याय मिळवून निर्भयतेने जगता येईल का ?हाच प्रश्न उपस्थित होत आहे.