शेवगाव पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या बदलीसाठी सर्वपक्षीय शेवगाव बंद !
शेवगाव/ प्रतिनिधी/- शेवगाव चे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांची बदली करून त्यांचे निलंबन यावे. या मागणीसाठी आज शेवगाव मध्ये सर्वपक्षीय शेवगाव बंदचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक आहुजा यांच्या बरोबर झालेल्या वादानंतर सोमवारी,१८ डिसेंबरला शहरांमध्ये सर्वपक्षीयांकडून शेवगाव बंदचे आयोजन केले होते. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून शहरातील मटका, बस स्टँड वरील चोऱ्या, शहरातील झालेल्या दुकानं फोड्या च्या घटना,अवैध दारू व्यवसाय, अवैध वाळू व्यवसाय,व विविध अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांकडून पोलीस खात्यावर खालच्या स्तरावर जाऊन आरोप करण्यात आले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शेवगाव शहरामध्ये जमावाने फिरून शेवगाव बंद चे आवाहन केले. याला व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी मोर्चाला सामोरे जाताना शेवगाव चे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी चौकशी करून कारवाई करू अशी भूमिका मांडली.पण जोपर्यंत गोविंदा ओमासे यांच्यावर कारवाई होणार नाही. तोपर्यंत आम्ही रोडवरून उठणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी ठेवल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता त्यानंतर शेवगावचे विभागीय पोलीस अधीक्षक यांनी पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती.--

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, नगरसेवक कमलेश गांधी, नगरसेवक अशोक आहुजा, भाजपाचे शहराध्यक्ष रवी सुरवसे, शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, नंदू मुंढे, दारूबंदीचे अमोल घोलप, प्रीतम गर्जे, अमोल पालवे, अजिंक्य लांडे, नितीन दहिवाळकर, अविनाश देशमुख, रिजवान शेख, नगरसेवक वजीर पठाण, अविनाश मगरे, बापूसाहेब भोसले, साईनाथ आधाट, तात्या पाटील लांडे व शहरवासीय उपस्थित होते.