Breaking News

विदर्भातील डेंग्यू प्रभावित जिल्ह्यात विशेष बाब म्हणून निदान प्रयोगशाळा सुरू करणार


राज्यात डेंग्यू निदानासाठी 38 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी विदर्भात 10 प्रयोगशाळा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे आहेत. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येथील तेथे विशेष बाब म्हणून डेंग्यू निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील. राज्यात नोव्हेंबरअखेर 38,574 व्यक्तींना स्वाईन प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली.
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात नोव्हेंबर अखेर डेंग्यूचे 6894 रुग्ण आढळून आले आहेत. विदर्भात ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात 234 रुग्ण आढळले, मात्र डेंग्यूमुळे रुग्ण दगावल्याची नोंद नाही. विदर्भ हा कि कीटकजन्य आजारासाठी अतिसंवेदशील असल्याने या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना गांभीर्याने राबविल्या जात आहेत.

यावेळी झालेल्या चर्चेत एका उपप्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी ऑसेल्टॅमीवीर हे औषध नागपूर येथील मेडिकल कॉलेज व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून सर्व औषधी दुकानातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भ हा कीटकजन्य आजारासाठी अतिसंवेदनशील असल्याने या विभागामध्ये कीटकजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत गांभीर्यपूर्वक राबविल्या जातात. यामध्ये आरोग्य विभागाचे कोणतेही दुर्लक्ष झाले नाही.