Breaking News

एफडीएकडून १९ लाखांचा गुटखा जप्त

दक्षिण मुंबईतील डोंगरी भागातील एका गोदामावर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाच्या(एफडीए) अधिकाऱ्यांनी एकूण १९ लाखांचा गुटखा जप्त केला. हे गोदाम अबू सलीम नावाच्या इसमाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतलेल्या एका खास मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. 


राज्य सरकारने राज्यभर गुटखा विक्रीला बंदी घातलेली असताना अनेक भागांत त्याची छुपी विक्री केली जाते. मुंबई शहरात अनेक पानविक्रीच्या टपरीवर गुटखा खुलेआम मिळतो. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्यानंतर अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी २०१२ पासून गुटखा व सुगंधी सुपारी तसेच पान मसाले विक्री करणाऱ्या दुकानांवर आणि या पदार्थाचा साठा करणाऱ्या गोदामांवर छापे घालण्याची मोहीम हाती घेतली