टू-जी निकालानंतर खटले दाखल करण्याच्या प्रमाणात वाढ
नवी दिल्ली : यूपीए सरकारच्या काळात २जी स्पेक्ट्रम वितरण पद्धतीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यासंबंधित खटल्याचा निकाल नुकताच लागून सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. असा घोटाळा झालाच नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
यामुळे या कथित भ्रष्टाचाराचा फटका बसलेले पक्ष आता न्यायालयात जाऊ लागले आहेत. परिणामी, असे खटले दाखल होण्याच्या प्रमाणात आता लक्षणीय वाढ झाली आहे. लूप टेलीकॉम कंपनीत भागीदारी असलेल्या दुर्बच्या खेतान होल्डिंग कंपनीने २जी निकालानंतर दूरसंचार विवाद निराकरण आणि अपील लवाद यांच्यासह सरकारच्या विरोधात आंतरराष्ट्रीय लवादात जाण्याची तयारी सुरू केली आहे.