Breaking News

गडचिरोलीत तीन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नागपूर, दि. 24, डिसेंबर - नक्षल चळवळीला हादरा देणारी बातमी आहे. तब्बल 2 लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. सतीश उर्फ हिळसा कोसा होळी, पाकली उर्फ पगणी अडगू पोयामी व मनोज उर्फ दशरथ सखाराम गावडे अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.


यासंदर्भात हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार सतीश होळी हा भामरागड दलममध्ये कार्यरत होता. तो ऑगस्ट 2014 मध्ये दक्षिण बस्तरमधील मोपस दलममध्ये भरती होवून फेब्रुवारी 2015 पर्यंत सदस्य म्हणून कार्यरत होता. त्यानंतर मार्च 2015 मध्ये त्याची मोपस दलममधून भामरागड दलममध्ये त्याची बदली करण्यात आली. तेथे ऑक्टोबर 2017 पर्यंत भामरागड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. त्याचा 2016 मधील छत्तीसगड इथल्या कुरेणार कडे जाणार्‍या मार्गावर अ‍ॅम्बुश चकमक, तसेच 2017 मधील मुकवाडा चकमकीसह अत्यंत गंभीर गुन्ह्यात सहभाग होता. सतीशच्या डोक्यावर दोन लाखांचे बक्षिस होते.