नाशकात 10 किलो गांज्यासह एकाला अटक
नाशिक, दि. 24, डिसेंबर - येथील हिरावाडी परिसरात 62 हजार रुपये किंमतीचा 10 किलो वजनाचा गांजा व 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी, असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आज जप्त केला. शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने ही कारवाई केली असून अमोल पाटील (वय 28) या संशयितास अटकही करण्यात आली असून त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसांना खब-यांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फु लेनगर भागात सापळा रचण्यात आला. तेथे अमोल पाटील हा दुचाकीने येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.