Breaking News

देशात 18 व्या वर्षी निवडणूक लढवता का येत नाही ? - आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 24, डिसेंबर - काही देशांमध्ये वयाच्या 18 व्या वर्षीच निवडणूक लढवता येते. त्याप्रमाणे भारतातही 18 किंवा 21 व्या वर्षी निवडणूक लढवता का येत नाही, असा प्रश्‍न युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून विचारला आहे.


सध्या लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान 25 वर्षे वय असणे गरजेचे आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे. राजकारणातील चांगल्या बदलासाठी आताची तरुणाई जबाबदार आहे. जास्तीतजास्त तरुण राजकारणात सक्रीय झाले तर त्याचा देशातील राजकारणालाच फायदा होईल. त्यामुळे यावरही विचार झाला पा हिजे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.