तू आराध्यासारखे वागू नकोस...
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल साईट्वर चांगलाच गाजत आहे. त्या व्हिडीओमध्ये सासरा आणि सुनेच्या सुरेख नात्याची बाजू पाहायला मिळत आहे.
त्याचं झालं असं की, एका पुरस्कार सोहळ्यातून बाहेर पडतांना पत्रकारांनी अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्याला गाठले. त्यावेळी ऐश्वर्या आणि अमिताभ दोघांनाही पुरस्कार मिळाला. या सर्व उत्साही वातावरणात ज्यावेळी ऐश्वर्याने अमिताभ यांना पाहताच ही इज द बेस्ट म्हणत तिने त्यांना मिठी मारली.
तेव्हा अमिताभ यांनीसुद्धा अनोख्या अंदाजात सुनेला सल्ला देत आराध्यासारखे वागू नको असे म्हटले. हे बोलताना अमिताभ यांच्या चेहऱ्यावर सिम्तहास्य पाहायला मिळाले. तसेच या व्हिडीओत अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यातील सुरेख क्षण पाहून अनेकांना त्यांचा हेवा वाटला.