Breaking News

गोवंश तस्करी करणारी मध्यप्रदेशची टोळी जेरबंद

पैठण प्रतिनिधी -पैठण औरंगाबाद रस्त्यावरील ढोरकीन गावालगतच्या कारखान्याजवळ काही तरुण एका मालमोटारीतून गोवंश खाली उतरवत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी गाडी थाबंवताच ते पळू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून चार तरुणांना ताब्यात घेतले.

 
मात्र एक अरोपी फरार झाला. पोलिसांनी मालमोटारीची तपासणी केली असता यात ५० गोवंश चारही पाय बांधल्या अवस्थेत आढळून आले. ते ताब्यात घेऊन सर्व गोवंश पैठण तालुक्यातील पारुडी येथील गोशाळेत पाठविले. पोलिसांनी या टोळीतील आरोपींची कसून चौकशी केली असता औरंगाबाद येथील कत्तलखान्यात सदर गोवंश घेऊन जाणार असल्याची कबुली या आरोपींनी दिली. याप्रकरणी पाच जणाविरुध पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री मध्यप्रदेश राज्यातील येथून हे गोवंश आणुन पैठण औरंगाबाद रस्त्यावरील चमडा फँक्टरी गोदामामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून ५० गोवंश (वासरू) पोलिसांनी ताब्यात घेतले. चार आरोपींना अटक केली आहे. एक अरोपी फरार झाला. गोवंशासह दहा टायर ट्रक, एक बोलोरो, स्पिप्ट असा एकूण २६ लाखांचा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. बुधवार रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिडकिन पोलीस उपनिरीक्षक पंडीत सोनवणे हे आपल्या सहकाऱ्यासह रात्रीची गस्त घालत असतांना त्यांच्या हा प्रकार निदर्शनात आला. पोलिसांनी गोवंश ताब्यात घेऊन सर्व गोवंश पैठण तालुक्यातील पारुडी येथील गोशाळा येथे पाठवली आहे.


 सोमवारी रात्री मध्यप्रदेश राज्यातील येथून हे गोवंश आणुन पैठण औरंगाबाद रस्त्यावरील चमडा फँक्टटरी गोदाममध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथील कत्तल खान्यात विक्री करण्यासाठी घेऊन जाणार होते अशी कबुली अरोपीनी दिली आहे. सदरची घटना पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने बिडकिन पोलिसांनी गोवंश व सर्व मुद्देमाल औद्योगिक वसाहत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

याप्रकरणी आरोपी अबीद शकुरखा डोल {रा. मुलतानपूर रा. तालुका जिल्हा मनसोर (मध्यप्रदेश), आझाद मंहमद रफिक न्याहगर,रा. मुलतान पुर, तालुका जिल्हा मनसोर, मध्यप्रदेश, शेखखलील शेख रशीद {रा. जमालशहा कॉलनी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद}, फेरोज सलमान शेख, {रा. शहागंज औरंगाबाद } या चार तरुणांना पोलिसांनी अटक केली. सल्लाद्दीन शेख हा फरार आहे.