Breaking News

साईज्योत’च्या कागदपत्रांसाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार : पवार

शिर्डी / प्रतिनिधि-  शहरातील साईबाबा संस्थानच्या २१५४ सभासदांची कामधेनु असलेली साई एम्प्लॉइज सोसायटीच्या मालकीची साईज्योत इमारत उभारण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव-कोऱ्हाळे शिवारात सुरु आहे. ही सोसायटीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर असून साईभक्तांना पेढा प्रसाद आदींसह विविध साहित्य माफक दरात साईभक्तांना उपलब्ध करून दिले जाते.


त्याबरोबरच सभासदांना कमीत कमी वेळेत कर्ज उपलब्ध करून देणारी ही संस्था असताना या संस्थेच्या मालकीच्या कोट्यवधी रु. खर्च करू जी इमारत {गट नं. ८०/०२} मध्ये काम सुरु आहे. कधी सांस्कृतिक भवन तर कधी साईज्योत असे या इमारतीला नाव दिले गेले. मात्र ६ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाने ६ महिन्यात इमारतीचे काम पूर्ण करून असे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही या कामाला गती येत नसल्याने या संपूर्ण कामाच्या परवानग्या व लेखापरीक्षण आदिबाबत खुलासा व कागदपत्र मिळावे, अशी मागणी विद्यमान संचालक विठ्ठलराव पवार यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राहाता यांच्याकडे केली आहे.