Breaking News

दबंग-३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

सुपरस्टार सलमान खानच्या 'दबंग' या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली असून, आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये सलमान आणि सोनाक्षीची अप्रतीम केमेस्ट्री पाहता या चित्रपटाच्या भाग-३ ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतीच सलमानने 'दबंग-३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा केली. 


सलमान सध्या 'दबंग टूर' साठी दिल्लीमध्ये असून त्याचसोबत तो 'रेस-३' या प्रोजेक्टवर सुद्धा लक्ष केंद्रित करत आहे. 'रेस-३' या चित्रपटात सलमानसोबत पुन्हा जॅकलिन फर्नांडिस रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपरस्टार प्रभूदेवा करणार आहे, तर रेस-३ ची शूटिंग संपल्यानंतर सलमान दबंग-३ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.