Breaking News

घरासमोरुन ट्रॅक्टर चोरीला ; गुन्हा दाखल


अहमदनगर/प्रतिनिधी। शहरातील नालेगाव भागातून घरासमोर लावलेला 1 लाख रुपये किंमतीचा न्यु हॉलंड कंपनिचा मॉडल नं.4510 निळे रंगाचा त्याचे हडास हिरवे रंगाची ताडपत्री लावलेली असून त्याचा त्याचा रजि.नं.एमएच 32 पी 4321 असलेला ट्रॅक्टर लाँक करुन लावलेला असताना तो कोणीतरी अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी वस्तुने वाहनाचे लॉक कशानेतरी तोडून चोरुन नेला आहे. याबाबत प्रताप मारुती शिंदे (वय वर्षे 31 रा.शिंदे निवास, नालेगाव,नगर कल्याण रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना काळे करत आहे.