उर्दू हायस्कूलच्या वकृत्व स्पर्धेत आस्मा शेखचे यश
शेख आफिया, कुरेशी आयेशा, तंजीता पटेल, असद शेख, गुलाम खान, आयेशा रिझवी, मोहंमद रिझवी, अब्दुल्ला आलजिलानी, नजीया बाबू, रिजवी आतेका, तांबोळी अल्फिया आदींनी भाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष मुख्तार उस्मान खान होते. विजयी स्पर्धकांना नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेविका रजीयाबी शेख, नगरसेवक प्रताप ढोकणे, सुनील थोरात, हंसराज आदिक, भाऊसाहेब वाघ, अमानत पतसंस्था
अध्यक्ष याकुबभाई बागवान, डॉ. राज तांबोळी, हमीद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापिका ढेरे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन तन्वीर यांनी केले. वसिम सय्यद यांनी आभार मानले.