Breaking News

कल्याणचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद कल्याण न्यायालयाने रद्द केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे अर्जुन म्हात्रे यांनी देवळेकर यांचे यापूर्वी देण्यात आलेले जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी करताना न्यायालयाने आदेश दिले. मात्र, या निर्णयास आव्हान देण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आल्याने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले.