Breaking News

मुंबईतील ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मुंबई पोलीस दलातील ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी आयुक्तांनी बदल्या केल्या. त्यात सहा वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे. पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रफुल्ल फडके यांची बदली नायगाव येथील हत्यारी विभागात झाली असून त्यांच्या जागी वरिष्ठ महिला निरीक्षक रोहिणी काळे यांची नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक जयप्रकाश भोसले यांच्याकडे चेंबूर पोलीस ठाण्याची जबाबदारी आली आहे. 


वाहतूक विभागातील संजय काळे यांना नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक केले असून विशेष शाखा-१चे संजीव पिंपळे यांची वाहतूक विभागात बदली झाली आहे. नागपाडा पोलीस ठाण्याचे बाळकृष्ण माने यांचीही वाहतूक विभागात वर्णी लागली आहे. शिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील चंद्रमोरे यांची आर्थिक गुन्हे शाखेत, किरण सोनकवडे यांची गोराई पोलीस ठाणे, गोराईचे निरीक्षक विनोद पाटील यांची आरे पोलीस ठाणे व विशेष शाखेतील निरीक्षक संजय निकम यांची बदली शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे..