Breaking News

तामिळनाडू व केरळात मुसळधार पाऊस; ४ ठार लक्षद्वीपकडे जाणाऱ्या वादळाने श्रीलंकेत ७ बळी

चेन्नई : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे ओखी चक्रीवादळ गुरुवारी दक्षिण भारतात धडकल्याने येथे हाहाकार माजला आहे. तामिळनाडू व केरळच्या तटीय जिल्ह्यांत थैमान घातल्यानंतर या वादळाने लक्षद्वीपकडे कूच सुरू केली आहे. 


कन्याकुमारीसह अनेक दाक्षिणात्य जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. येत्या २४ तासांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या वादळाने भारतात चौघांचा तर श्रीलंकेतही सात जणांचा बळी गेला आहे.