Breaking News

सख्ख्या पुतण्याने केला काकुवर अत्याचार

चोपडा : आदिवासी कुटुंबातील विवाहीत काकूवर गावातीलच सख्ख्या पुतण्याने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना धुपे खुर्द ता.चोपडा येथे मंगळवारी दुपारी घडली. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, दि.५ डिसेंबर रोजी दुपारी ११ : ३० वाजता चोपडा तालुक्यातील धुपे खु ॥ येथील विवाहित महिला मजुरीचे पैसे देण्यासाठी जुने धुपे खु॥ येथे सख्ख्या पुतण्यासोबत शेतातील रस्त्यावरून जात असतांना गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर फोन लावून देतो, असे सांगून महिलेला नाल्याच्या काठी घेऊन जाऊन संशयीत आरोपी समाधान उर्फ पिंट्या हिरामण अहिरे याने बळजबरीने बलात्कार केला. 

तसेच याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला जिवेठार मारू अशी धमकी दिली. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला भा.दं.वि.३७६ (२) (क), ३२३ ,५०४ ,अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास प्रभारी प्रशिक्षणार्थी उपाधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दाभाडे करीत आहेत.